
मुंबई: आज मुंबईमध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संदिपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
आम्ही बंडखोरी केली तेव्हा अनेकांनी आमच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्या, आम्ही ५० आमदास निवडून येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत, पण मी सांगतो या ५० आमदारांपैकी एकही आमदार पराभूत झालातर मी राजकारण सोडून देईन, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
आता शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात एकही काम शिल्लक राहणार नाही हा विश्वास आहे. मी सुरू केलेले ऑपरेशन नेहमीच पूर्ण होतं. सुरुवातीला मी छोटे मोठे ऑपरेशन करायचो. हे मोठे ऑपरेशन होते. त्यामुळे मलाही काळजी होती. मी त्यावेळी झोपत नव्हतो. मला माझे टेन्शन नव्हते पण या ५० आमदारांच्या भविष्याचे टेन्शन होते. तरही आम्हाला कामाखे देवीनेही आशीर्वाद दिले आहेत. कामाखे देवीकडे ५० बळी गेले म्हणत, बळी कोणाचा घेतला कामाखे देवीने हे सर्वांना माहितीय, असा टोलाही त्यांनी लगावला एखनाश.