Video : रिटायरमेंटनंतरही क्रिकेटच्या देवाचा आजही तोच क्लास, त्याच्या दोन खणखणीत बाऊंड्री चुकवू नका

WhatsApp Group

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह, इंडिया लिजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्सने 20 षटकांत दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला 217 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. इंडिया लिजेंड्ससाठी स्टुअर्ट बिन्नीने 42 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 82 धावांचे तुफानी अर्धशतक झळकावले. दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला केवळ 156 धावा करता आल्या आणि इंडिया लिजेंड्सने हा सामना 61 धावांनी जिंकला.

1996ची झलक 

काल ज्यांनी सामना पहिला त्यांना सचिनच्या फलंदाजीमध्ये 1996 ची झलक पाहायला मिळाली. सचिन या सामन्यात फार मोठी खेळी खेळला नाही. त्याने 15 चेंडूत 16 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 चौकार मारले हे दोन्ही चौकार एकदम कडक होते. 90च्या दशकातील सचिनच्या फलंदाजीची आठवण करून दिली.

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठरले अपयशी 

218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका लिजेंड्सची सुरुवात चांगली झाली आणि संघाने पहिल्या विकेटसाठी 43 धावा केल्या. त्याचवेळी राहुल शर्माने संघाला पहिला धक्का दिला. त्याने 26 धावांवर मॉर्न व्हॅन व्याकला बाद केले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला अल्विरो पुटिकच्या रूपाने दुसरा धक्का बसला, तो 23 धावा करून ओझाचा पहिला बळी ठरला. त्याचवेळी आफ्रिकेला 77 धावांवर तिसरा धक्का बसला आणि 10 धावांच्या स्कोअरवर अल्विरो पीटरसन प्रग्यान ओझाचा दुसरा बळी ठरला. युवराज सिंगने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला, त्याने हेन्री डेव्हिसला 6 धावांवर बोल्ड केले. साउथ फ्रीकाकडून कर्णधार जॉन्टी रोड्सने 38 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका लीजेंड्समध्ये भारताच्या गोलंदाजांविरुद्ध एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. आणि त्यांचा संपूर्ण संघ 156 धावा करू शकला. भारताकडून राहुल शर्माने 3, प्रग्यान ओझा, मुनाफने 2-2 बळी घेतले. याशिवाय युवराज, इरफान यांना 1-1 असे यश मिळाले. त्यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंडिया लिजेंड्सने हा सामना 61 धावांनी जिंकला.