EPFO Balance: पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत? ‘असा’ चेक करा बँक बॅलेन्स

WhatsApp Group

तुम्ही जर EPFO ​​चे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. ईपीएफओकडून अनेक योजनांचे लाभ दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ते त्यांच्या पीएफ खात्यात पैसे जमा करतात. कर्मचारी निवृत्तीनंतर त्याचा लाभ घेऊ शकतात. आर्थिक सुरक्षेबरोबरच EPFO विमा संरक्षण आणि पेन्शन लाभ देखील प्रदान करते. ईपीएफमध्ये तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सहजपणे शिल्लक तपासू शकता. आपण त्याबद्दल टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ शकता.

ईपीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची

1. एका मिस कॉलद्वारे जाणून घ्या पीएफ अकाऊंटमधील रक्कम

पीएफ बँक बॅलेन्स तुम्ही फक्त मिस कॉलद्वारे चेक करु शकता. त्यासाठी तुमच्‍या रजिस्‍टर मोबाईल नंबरवरुन 9966044425 या नंबरवर मिस कॉल द्या. त्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या मोबाइलवर पीएफएफमध्ये जमा रकमेची माहिती मिळेल. पण लक्षात ठेवा पीएफ बँकेचा तुमचा युनिवर्सल नंबर अॅक्टिव्ह असायला हवा तरच तुम्हाला ही माहिती मिळेल. त्याच्यासोबत UAN सोबतही तुमचा मोबाईल नंबर नोंदवलेला असणं आवश्यक आहे.

2. एसएमएस (SMS) द्वारे देखील पीएफ अकाऊंट बॅलन्स चेक करु शकता

मिस कॉल व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या मार्गानेही रक्कम पाहू शकता. SMS करुन पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन EPFOHO UAN नंबर टाईप करा. हा SMS 7738299899 नंबरवर पाठवा. त्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेली रक्कम कळेल.

3. उमंग (UMANG) अ‍ॅपद्वारे जाणून घ्या पीएफ रक्कम

SMS आणि मिस कॉल या दोन मार्गांव्यतिरीक्त उमंग अ‍ॅप पण एक पर्याय आहे. तुम्‍ही उमंग अ‍ॅप पीएफमधील रकम जाणून घेण्यासाठी वापरु शकता. त्यासाठी उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. नंतर आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून अ‍ॅप सुरु करा. त्यानंतर सर्व सेवा पर्याय निवडा आणि EPFO ​​ऑप्शनमध्ये जाऊन पासबुक निवडा. त्यानंतर तिथे UAN नंबर आणि ओटीपी टाका. नंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेली माहिती मिळेल.