क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी; World Cup विजेता कर्णधार घेणार निवृत्ती

WhatsApp Group

इंग्लंडच्या खेळात क्रांती घडवणारा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. 2019 साली इंग्लंडला विश्वविजेता बनवणारा हा कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इऑन मॉर्गन त्याच्या खराब फॉर्ममुळे हैराण झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॅटने धावा मिळत नाहीत त्यामुळेच तो क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो.

इंग्लिश मीडियाच्या वृत्तानुसार, इयॉन मॉर्गन आता पूर्वीसारखा तंदुरुस्त नाही आणि त्याचा फॉर्मही बऱ्याच दिवसांपासून खराब आहे, त्यामुळे इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचे ठरवले आहे.इंग्लिश कर्णधार इऑन मॉर्गनला नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेत एकही धाव काढता आली नाही. इंग्लिश कर्णधाराने दोन्ही सामन्यात खातेही उघडले नाही आणि दुखापतीमुळे तो शेवटचा वनडे खेळू शकला नाही.

मॉर्गनने आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा असल्याचे सांगितले असले तरी, द गार्डियन या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आता हा खेळाडू निवृत्त होणार आहे.

इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करून वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर मॉर्गनला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला फलंदाजीत लय सापडलेली नाही. त्याने ऑगस्ट 2020 पासून मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात एकूण २६ इनिंगमध्ये केवळ एक अर्धशतकी खेळी केली आहे. 2019 वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने केवळ आयर्लंडविरुद्ध एक शतक केलं आहे.