इंग्लंडच्या खेळाडूला मैदानावरच कोसळलं रडू; नेमकं काय घडलं मैदानात?, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (IND-W vs ENG-W) अतिशय मनोरंजक पद्धतीने संपली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय खेळाडू दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाजाला मंकडिंगद्वारे पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दीप्ती शर्माच्या या मंकडिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मंकडिंग हे क्रीडा भावनेच्या विरुद्ध मानले जाते. यापूर्वीही यावरून वाद झाले आहेत. आयपीएलमध्ये आर अश्विनने एकदा जॉस बटलरला अशाच पद्धतीने बाद केले आहे. आता दीप्ती शर्माने या घटनेची पुनरावृत्ती केल्याने पुन्हा एकदा चर्चा होत आहे. मात्र, आयसीसीने आता नवीन नियमांमध्ये मंकडिंगला रनआउटच्या श्रेणीत स्पष्टपणे स्थान दिले आहे.

दीप्ती शर्माने अतिशय महत्त्वाच्या वळणावर मंकडिंगचा वापर केला. इंग्लंड संघाला विजयासाठी 40 चेंडूत 17 धावा हव्या होत्या आणि एक विकेट शिल्लक होती. या सामन्यात इंग्लंडची विजयाकडे वाटचाल सुरू होती. त्यानंतर 44व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दीप्तीने चार्ली डीनला मंकडिंगच्या माध्यमातून धावबाद केले. जेव्हा दीप्ती हा तिसरा चेंडू टाकण्यासाठी ऍक्शनमध्ये होती, तेव्हाच तिला चार्ली क्रीझच्या पलीकडे गेल्याचे दिसले, अशा परिस्थितीत दीप्तीने तिच्या हातातून चेंडू न सोडता स्टंप उडवले.

दुसरीकडे धावबाद झाल्यामुळे चार्ली डीनला अश्रू अनावर झाले. तिला मैदानावरच रडू कोसळले. यामुळेही अनेकांनी दिप्तीने मंकडिंगच्या मदतीने फलंदाजाला धावबाद करणे चुकीचे होते, असे म्हटले जात आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा