
Highest ODI Score : डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 498 धावांचा डोंगर उभारलाय. नेदरलँड संघाला विजयासाठी तब्बल 499 धावांचे आव्हान दिलेय.
नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जेसन रॉय एक धावा करत तंबूत परतला. पहिली विकेट झटपट पडल्यानंतर डेविड मलान आणि फिल साल्ट यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. दोघांनी तब्बल 223 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. फिल साल्ट याने 122 धावांची खेळी केली. तर डेविड मलान याने 125 धावांची वादळी खेळी केली.
Incredible.
We break our own World Record with a score of 4️⃣9️⃣8️⃣
🇳🇱 #NEDvENG 🏴 pic.twitter.com/oWtcfh2nsv
— England Cricket (@englandcricket) June 17, 2022
आयपीएलमध्ये तुफानी खेळी करणाऱ्या जोस बटलरने नेदरलँडच्या गोलंदाजांची पिटाई केली. बटलरने अवघ्या 70 चेंडूत 162 धावा केल्या. बटलरशिवाय फिल साल्ट याने 93 चेंडूत 122 तर डेविड मलान याने 109 चेंडूत 125 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोन यानेही या सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत 66 धावांची खेळी केली.
वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरपैकी पहिले तिन्ही स्कोअर हे आता इंग्लंडच्याच नावावर आहेत. मुख्य म्हणजे हे तिन्ही स्कोअर इंग्लंडने मागच्या 6 वर्षांमध्ये केले आहेत. नेदरलँडविरुद्धच्या या स्कोअरआधी इंग्लंडने 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481/6 तर 2016 साली पाकिस्तानविरुद्ध 444/3 एवढा स्कोअर केला होता.