T20 World Cup 2022 Final PAK vs ENG: बेन स्टोक्सच्या झुंजार खेळीच्या जोरावर इंग्लंडने T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. इंग्लंडचे हे दुसरे टी-20 विश्वचषक विजेतेपद आहे, त्याआधी त्यांनी 2010 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बेन स्टोक्सच्या नाबाद 52 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 6 चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली.
नाणेफेक हरल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी सुरुवातीपासूनच ढासळताना दिसली. सॅम करनने मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मोहम्मद हरीसही फार काळ टिकू शकला नाही आणि 8 धावांवर आदिल रशीदचा बळी ठरला. यानंतर बाबर आझम एका टोकाला उभा राहिला पण आदिल रशीदने त्याला फार काळ टिकू दिले नाही आणि पाकिस्तानच्या कर्णधाराला 32 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
WHAT A WIN! 🎉
England are the new #T20WorldCup champions! 🤩#PAKvENG | #T20WorldCupFinal | 📝 https://t.co/HdpneOINqo pic.twitter.com/qK3WPai1Ck
— ICC (@ICC) November 13, 2022
शान मसूद एका टोकाला उभा होता पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत होत्या. इफ्तिखार अहमदला खातेही उघडता आले नाही. शादाब खानने मसूदला साथ दिली आणि 5व्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. 20 षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या 8 बाद 137 अशी होती. 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकातच मागील सामन्याचा हिरो अॅलेक्स हेल्स 1 धावावर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार जोस बटलरने 17 चेंडूत 26 धावा केल्या. त्याच्यामागोमाग फिल सॉल्टलाही 10 धावा करत तंबूत परतला. हॅरिस रौफने इंग्लंडला बॅक टू बॅक दोन धक्के दिले आणि पॉवरप्लेमध्ये तीन इंग्लिश खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हॅरी ब्रूकने 20 धावा करत बेन स्टोक्सला साथ दिली आणि चौथ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. यानंतर ब्रूक शादाब खानचा बळी ठरला, पण जोपर्यंत स्टोक्स टिकून राहिला तोपर्यंत पाकिस्तानच्या आशा धोक्यात आल्या होत्या.
बेन स्टोक्स ठरला हिरो
Our superhero ❤️ pic.twitter.com/6B23Rp0Kgi
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
शाहीन आफ्रिदी 16 वे षटक टाकण्यासाठी आला, तो दुखापतीमुळे षटक पूर्ण करू शकला नाही त्याने फक्त एक चेंडू टाकला. यानंतर इफ्तिखार अहमद आपले षटक पूर्ण करण्यासाठी आला, त्याने पाच चेंडूत 13 धावा दिल्या, ज्यामध्ये स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार मारून पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या. इंग्लंडला शेवटच्या 4 षटकात 28 धावांची गरज होती. येथून इंग्लंडला गती मिळाली आणि मोईन अलीनेही आघाडी घेतली. स्टोक्सने 49 चेंडूत 52 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आणि 19 षटकात लक्ष्य गाठून इंग्लंडला विश्वविजेते बनवले.