Moeen Aliने रचला नवा इतिहास, इंग्लंडसाठी ठोकलं सर्वात वेगवान अर्धशतक

WhatsApp Group

आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेची इंग्लंड संघाने दमदार सुरुवात केली आहे. इंग्लंड संघाने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 41 धावांनी पराभव केला. इंग्लंडने दिलेल्या 235 धावसंख्येच्या पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ खूपच मागे राहिला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मोईन अलीने आपल्या संघासाठी इतिहास रचला.

मोईन अली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मोईन अलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्या आधी, इंग्लंडसाठी T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम लियाम लिव्हिंगस्टोनच्या नावावर होता, ज्याने पाकिस्तान संघाविरुद्ध 17 चेंडूत ही कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार डेव्हिड मिलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने सुमारे अर्धा डझन संधी गमावल्या, ज्याचा फायदाही झाला, कारण इंग्लंडच्या संघाने 20 षटकात 6 विकेट गमावून 234 धावा केल्या. यामध्ये जॉनी बेअरस्टोने 53 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 90 धावा, मोईन अलीने 18 चेंडूत 52 धावा, 23 चेंडूत 43 धावा आणि कर्णधार जोस बटलरने 7 चेंडूत 22 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 5 बळी घेतले. त्याचवेळी 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने 57 धावा केल्या. त्याच्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 28 चेंडूत 72 धावांची खेळी केली. हे वगळता दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला अप्रतिम कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच संघाला 20 षटकांत 8 विकेट गमावून 193 धावा करता आल्या आणि सामना 41 धावांनी गमवावा लागला.