ईडीची मोठी कारवाई; ED कडून नवाब मालिक यांच्या ८ मालमत्ता जप्त

WhatsApp Group

मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांच्या मुंबईसह इतर भागांमधील विविध आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

दाऊद इब्राहीमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने आता त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

मुंबईतील कुर्ला येथील जमिनीसह राज्यातील इतर भागांमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील व्यावसायिक मालमत्ता, उस्मानाबादमधील १४७ एकर जमीन देखील ईडीने जप्त केली आहे. जवळपास पावणेदोन महिन्यांपासून नवाब मलिक हे या प्रकरणामध्ये अटकेत आहेत.

मलिकांची जप्त केलेली संपत्ती –

  • गोवावाला कंपाऊंड, कुर्ला (पश्चिम)
  • एक व्यावसायिक युनिट, कुर्ला (पश्चिम).
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील ५९.८१ हेक्टर शेतजमीन
  • कुर्ला पश्चिम इथले तीन फ्लॅट
  • वांद्रे पश्चिम इथले दोन फ्लॅटचा समावेश आहे.