शिवसेनेला धक्का, प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

WhatsApp Group

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने सुरू आहे. आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. ईडीने सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये ठाणे शहरातील दोन फ्लॅट आणि एका जमिनीचा समावेश आहे. 2013 साली मुंबई पोलिसांच्या EOW ने नोंदवलेल्या FIR क्रमांक 216 चा तपास ईडीने सुरु केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी ते उद्धव ठाकरेंकडे सातत्याने करत होते.

अशा स्थितीत आगामी काळात महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्याआधीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.