राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, 3 सुरक्षा कर्मचारी जखमी

WhatsApp Group

आपल्या देशाचे जवान आणि पोलीस जम्मू-काश्मीर दहशतवादमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या मोहिमाही राबवत असतात. दरम्यान, राजौरी जिल्ह्यात ३ ते ४ दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांसह सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली. सोमवारी संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी गराडा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी ही चकमक सुरू झाली

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी राजौरी जिल्ह्यातील कालाकोट जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली. रविवारी सुरू झालेली ही मोहीम सोमवारीही दिवसभर सुरू होती. सोमवारी संध्याकाळी उशिरा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गराडा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा दलांशी चकमक सुरू झाली.

राजौरी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी उशिरा दहशतवाद्यांशी सुरू झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. 3 जखमी जवानांपैकी 2 स्पेशल फोर्सचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे.

जम्मूच्या संरक्षण प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘1 ऑक्टोबर रोजी गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली की राजौरी परिसरात काही संशयास्पद लोकांच्या हालचाली सुरू आहेत. या माहितीनंतर भारतीय लष्कर आणि पोलिसांनी कालाकोटमध्ये संयुक्तपणे शोध मोहीम राबवली.

ते पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अजूनही मोहीम सुरूच आहे.