EMU ट्रेनचा डबा रुळावरून घसरला, टळला मोठा अपघात!

WhatsApp Group

राजधानी दिल्लीत रविवारी मोठा रेल्वे अपघात टळला. दिल्लीत रविवारी लोकल ईएमयू ट्रेनचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. दिल्लीतील भैरों मार्गाजवळ ही घटना घडली. या अपघातात कोणीही जखमी किंवा ठार झाल्याचे वृत्त नाही. अपघातानंतर रेल्वेचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वे कर्मचारी ट्रॅक आणि गाड्यांच्या दुरुस्तीचे काम करत आहेत. जेणेकरून लवकरात लवकर ट्रॅक सुरळीत करता येईल.

रेल्वेच्या डीसीपींनी सांगितले की, दिल्लीतील भैरों मार्गाजवळ लोकल ईएमयू ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला आहे. यात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा G-20 शिखर परिषदेची तयारी दिल्लीत जोरात सुरू असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.