सेल्फीसाठी 14 हजार, भेटण्यासाठी 38 हजार… अभिनेत्रीचे चाहत्यांसाठी नियम!

WhatsApp Group

आवडता सेलिब्रिटी दिसताच चाहत्यांचा स्वत:वर ताबा राहात नाही. त्याला पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. संधी मिळताच फोटो काढतात. (Selfie with celebrity) काही धाडसी चाहते तर बॉडीगार्ड्सची नजर चुकवून सेल्फी काढण्याचा देखील प्रयत्न करतात. परंतु या अभिनेत्रीसोबत तुम्हाला सेल्फी काढायचे असतील तर मात्र तुम्हाला पैसे द्यावे लागतील. फुकट सेल्फी मिळणार नाहीत. एवढंच नाही तर सेल्फी काढताना बोलायचं असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. अन् जर का तुम्ही तिचा गुपचूप फोटो काढला तर तुम्हाला जेल देखील होऊ शकते ? त्यामुळे या अभिनेत्रीपासून थोडे सावधच राहा.

या अभिनेत्रीचं नाव आहे एमिलिया क्लार्क. (Emilia Clarke) गेम ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून ती नावारुपास आली होती. (Game of Thrones) या मालिकेत तिने साकारलेली मदर ऑफ ड्रायगन डेनेरियस टारगेरियन ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. त्यामुळे आज जगभरातील लाखो करोडो चाहते तिला फॉलो करतात. तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घरासमोर तासंतास उभे राहतात. परंतु या चाहत्यांना आता यापुढे फुकट फोटो, सेल्फी, ऑटोग्राफ मिळणार नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @emilia_clarke

जर सेल्फी घ्यायचे असतील तर चाहत्यांना 14 ते 38 हजार रुपये तिला द्याले लागणार आहेत. शिवाय सेल्फी काढताना बोलायचं असेल तर 9 हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. यापुढे चाहत्यांना अभिनेत्रीचं फुकट प्रेम मिळणार नाही, अशी घोषणा खुद्द एमिलियाने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

एमिलिया meet and greet या ट्रेंडमध्ये सामिल झाली आहे. म्हणजे चाहत्यांना आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. डेली मेल युकेने दिलेल्या वृत्तानुसार एमिलियाने meet and greet च्या माध्यमातून आतापर्यंत 37 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक पैसे कमावले आहेत. हे पैसे ती स्वयंसेवी संस्थांना दान करते.