एल्विश यादवला अटक, साप विष प्रकरणी पोलिसांनी केली मोठी कारवाई

WhatsApp Group

Elvis Yadav arrested: यूट्यूबर एल्विश यादव याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. नोएडा पोलिसांनी गेल्या वर्षी सापाच्या विष प्रकरणी सेक्टर 49 मध्ये एफआयआर दाखल केला होता.

8  नोव्हेंबर रोजी एका रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा वापर केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी यूपीच्या नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध सेक्टर 39 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तसेच पोलिसांनी राहुल, नारायण, टिटूनाथ, जयकरण आणि रविनाथ नावाच्या आरोपींना अटक केली होती. सर्वात मोठी बाब म्हणजे राहुल नावाच्या आरोपीकडून 20 मिली सापाचे विष सापडले.

पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली: नोएडा पोलिसांनी आज एल्विश यादवची सापाच्या विषाशी संबंधित एका प्रकरणात चौकशी केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता एल्विश यादवला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी पाच आरोपी आधीच कारागृहात आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

एल्विश यादव या घटनेवर काय म्हणाला? जेव्हा नोएडा पोलिसांनी सापाच्या विषासंदर्भात गुन्हा दाखल केला होता, तेव्हा एल्विश यादवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपले स्पष्टीकरण दिले होते. यावेळी तो म्हणाला की, मी सकाळी उठलो तेव्हा वृत्तवाहिन्यांवर पाहिले की एल्विश यादव ड्रग्जच्या व्यापारात गुंतला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. मी तुम्हाला सांगतो की माझा याच्याशी काहीही संबंध नाही आणि ही फेक न्यूज आहे.