
एक हत्ती रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दृश्य महाराष्ट्रातील आहे. ट्विटरवर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी मार्ग मोकळा करताना दिसत आहे. हत्ती रस्त्यात अडथळा आणत दुचाकीला लाथ मारून आपला रस्ता करतो. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
रानटी हत्तींचा कळप सद्या भंडारा जिल्ह्यात असून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही ते या कळपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम काय होतात ते बघा…!@MahaForest@ranjeetnature@WildEleEarth#elephant pic.twitter.com/vUdU0HXqB0
— Sumit Pakalwar (@PakalwarSumit) December 8, 2022