मुंबईत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

WhatsApp Group

मुंबई: वसई पूर्व येथील रामदास नगर येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.घरात चार्जिंग करत असताना इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी अचानक स्फोट झाली. त्यामुळे घराला आग लागली आणि त्या आगीत भाजल्यामुळे 7 वर्षीय शब्बीर अन्सारी याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

इलेक्ट्रिक वाहनाच्या डिटेचमेंट बॅटरीमध्ये स्फोट झाल्यानंतर शब्बीर अन्सारी 80% भाजला होता. वसईतील सर्फराज अन्सारी यांच्या घरातील एका खोलीत बॅटरी चार्ज करताना स्फोट झाला. शब्बीर आजीसोबत दिवाणखान्यात झोपला होता. दुपारी अडीचच्या सुमारास सर्फराजने दिवाणखान्यात बॅटरी चार्ज करून ठेवली आणि बेडरूममध्ये झोपायला गेला. शब्बीरची आईही बेडरूममध्ये झोपली होती. पहाटे 5.30 च्या सुमारास स्फोट आणि शॉर्ट सर्किटच्या आवाजाने त्यांना जाग आली.

या स्फोटात त्याची आजी किरकोळ जखमी झाले, तर शब्बीर गंभीर जखमी झाला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले जेथे 30 सप्टेंबर रोजी शब्बीरचा मृत्यू झाला. स्फोटात खिडक्यांच्या काचा फुटल्या असून घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील उपकरणे आणि गॅझेटचीही नासधूस झाली. स्कूटर घराबाहेर उभी करून सुरळीत होती.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा