
Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचे शुक्रवारी दुपारी स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपपैकी कोणत्याही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. यात सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि पंरपरा आहे की, राज्यसभा निवडणुक सर्व पक्षीय सांमज्यसाने बिनविरोध करण्याची… मात्र भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या आडमुठे धोरणामुळे अखेर राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची वेळ आली आहे.
घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यामुळे या निवडणुकीमध्ये घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार हे आता उघड झालं आहे.