
सांवतवाडी: शिरशिंगे ग्रामपंचायत निवडणुकित भाजपने आपला झेंडा रोवला आहे. सांवतवाडीच्या शिरशिंगे ग्रामपंचायत निवडणुकित सरपंचपदाच्या निवडणुकित भाजप पुरस्कृत दिपक राऊळ यांची निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत सदस्यपजी सचिन धोंड आणि बाळा पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकित सदस्यपदी प्रभाग २ मधून भाजपचे सचिन धोंड तर प्रभाग ३ मधून ठाकरे गटाचे बाळा पेडणेकर हे सदस्य विजयी झाले आहेत.
निकाल खालीलप्रमाणे
वॉर्ड 1
दिपक राऊळ :161
पांडुरंग राऊळ: 148
सुरेश शिर्के: 51
वॉर्ड 2
दिपक राऊळ : 235
पांडुरंग राऊळ: 62
सुरेश शिर्के: 70
वॉर्ड 3
दिपक राऊळ : 173
पांडुरंग राऊळ: 23
सुरेश शिर्के: 224
Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा