राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, पक्षाचं नावही वापरता येणार नाही

WhatsApp Group

नवी दिल्लीतून एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही अशीही माहिती समोर आली आहे. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते.