Video: भरधाव दुचाकीने वृद्ध महिलेला उडवले, उपचारादरम्यान झाला मृत्यू

0
WhatsApp Group

पुणे : बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे देशात दररोज हजारो लोकांचा मृत्यू होतो. पुणे येथून ताजी घटना समोर आली आहे, जिथे भरधाव दुचाकीने एका वृद्ध महिलेला एवढी धडक दिली की, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये ती महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, मात्र त्याचदरम्यान एका भरधाव दुचाकीने तिला उडवले.

ही घटना पुण्यातील कर्वेनगर भागातील आहे. पुण्यातील या परिसरात अल्पवयीन मुलांकडून बेदरकारपणे वाहने चालवली जात आहेत. एक महिला या निष्काळजीपणाची बळी ठरली, ज्यात तिला आपला जीव गमवावा लागला.

याप्रकरणी बेफिकीर वाहनचालक आणि सायलेन्सर व हॉर्न वाजवून आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंगणे होम कॉलनीतील रहिवाशांकडून होत आहे. अशा बेफिकीर वाहनचालकांवर तातडीने कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

असे अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे झाले असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यासाठी जनजागृतीही व्हावी आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत.