ठाणे – मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात एका वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे murdered in Thane Bhiwandi.
हल्लेखोराने घरात घुसून धारदार शस्त्राने या वयोवृद्ध दाम्पत्याची निर्घुणपणे हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडांमुळे संपूर्ण भिवंडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सत्यभामा पाटील आणि बाळू पाटील अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मूतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या प्रकरणी मारेकाऱ्यांविरोधात गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे तर हत्येचं कारण अद्याप समजू शकले नाहीय.