एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला मोठा धक्का, आठवा मंत्री गुवाहाटीकडे रवाना

WhatsApp Group

शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. मात्र, आता ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीकडे रवाना झाला आहेत.

ते सध्या सुरतहून निघाले असून लवकरच गुवाहाटीमध्ये पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. उदय सामंत हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय होते. सोबत शिवसेनेच्या बैठकांलाही ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांकाम शिंदे गटात सामील होणं, शिवसेनेसाठी नक्कीच अनपेक्षित होतं.