एकनाथ शिंदेचा मोठा डाव, शिवसेनेचं प्रतोद पदच केलं अवैध

WhatsApp Group

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.