ठाणे – शिवसेनेचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचा वाढदिवस येत्या 9 फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त ठाण्यात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ future Chief Minister of Maharashtraअसा केला आहे. असे पोस्टर झळकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा Shivsena बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याचे Thane पालक मंत्री आणि कोपरी पाकचपाखाडी मतदारसंघांचे आमदार आणि राज्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत.
ठाण्यातील पाचपाखाडी या भागात एकनाथ शिंदे यांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले आहे. येथील मतदारसंघ तसेच शहरातील अनेक भागात एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहे.
या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. दरम्यान आता या पोस्टर्समुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा
धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!