
मराठवाडा कोकण ठाण्यातील 25आमदारांसह शिवसेनेचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल सायंकाळपासून नॉटरिचेबल असून ते थेट गुजरातमधील सुरत मधील हॉटेल मीडियन मध्ये असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कारभारावर गेले वर्षभर प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होतीच एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे.
काल दिवसभर विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू होती विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसबरोबरच शिवसेनेचीही मते तूठली आहेत ही तूटलेली सर्व मते एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची असण्याचीच शक्यता अधिक आहे.
त्यामुळेच काल संध्याकाळी एकनाथ शिंदे विधानभवनातून मतमोजणीचा निकाल लागण्याआधीच बाहेर पडले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील किमान 25 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचा शिक्का आहे अशा शिवसेना आमदारांचे मोबाईल फोन हे नॉटरिचेबल येत आहेत त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतमधील हॉटेलमध्ये असावेत असा सेना नेत्यांचा कयास आहे.