तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, कायदा आम्हीही जाणतो; एकनाथ शिंदेंचा पलटवार

WhatsApp Group

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. असं ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे.