Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आता भाजपलाच धक्का…

WhatsApp Group

मुंबई : शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदें यांना पाठिंबा दिला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला खिंडार पडले होते. दरम्यान आता एकनाथ शिंदे गटाकडून थेट भाजपलाच धक्का देण्यात आला आहे.

रविवारी भाजपच्या तब्बल 100 महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 च्या भाजपा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह 100 महिलांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.