Eknath Shinde Cabinet Expansion : भाजपचे 8, शिंदे गटाचे 7; राज्याच्या मंत्रिमंडळात ही नावं निश्चित…

WhatsApp Group

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होणार आहे. बराच विचारविनिमय केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मंत्रिवाटपाचा निर्णय झाला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आठ आणि एकनाथ शिंदे गटाचे सात मंत्री पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, या यादीत महाराष्ट्राच्या मागील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनेक ज्येष्ठ आमदारांचा पत्ताही या शिंद मंत्रिमंडळात कापण्यात आला आहे. पाहूया संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

  • चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
  • सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
  • गिरीश महाजन (Girish Mahajan)
  • राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)
  • बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)
  • प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
  • रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)
  • नितेश राणे (Nitesh Rane)

शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?

  • गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
  • उदय सामंत (uday Samat)
  • दादा भुसे (Dada Bhuse)
  • शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
  • अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
  • दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
  • संदीपान भुमरे (Sandipan Bhumare)
  • संजय शिरसाट (Sanjay Shirsat)
  • अपक्षांपैकी बच्चू कडू किंवा रवि राणा यांना संधी दिली जाऊ शकते. 

एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल महिनाभरानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. विरोधी पक्ष शिंदे सरकारवर निशाणा साधत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना झाला नसला तरी शिंदे सरकारने या काळात 651 हून अधिक सरकारी आदेश जारी केले आहेत. त्यापैकी 100 हून अधिक आदेश केवळ आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत 182 सरकारी आदेश जारी केले होते.