मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

WhatsApp Group

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेचे 38 आणि अपक्ष असे 50 आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाचं नाव आता ठरलेलं आहे.

एकनाथ शिंदे गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. आज संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. आता या नावाला शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.