भारतीय हवाई दलाची Indian Air Force 8 लढाऊ विमाने सौदी अरेबियाच्या भूमीवर दाखल झाली आहेत. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाचे विमान सौदी अरेबियाच्या भूमीवर उतरले आहे. 26 फेब्रुवारी रोजी 8 भारतीय लढाऊ विमाने सौदी अरेबियाच्या एअरबेसवर Royal Saudi Air Force base दाखल झाली. हे ‘फ्रेंडली’ स्टॉपओव्हर म्हणून बोलले जात आहे. त्याअंतर्गत येथे विमानांमध्ये इंधन भरून देखभाल दुरुस्तीची तपासणी करण्यात आली.
यापूर्वी भारतीय हवाई दलाचे कोणतेही विमान सौदी अरेबियातील Saudi Arabia कोणत्याही हवाई तळावर उतरले नव्हते. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधांमध्ये ही घटना ऐतिहासिक क्षण मानली जात आहे. पारंपारिकपणे, सौदी अरेबिया संरक्षणाच्या बाबतीत पाकिस्तानच्या जवळ आहे. त्यामुळेच सौदीने भारतासोबतचे संरक्षण संबंध कमी केले होते. परंतु, सध्याची सामरिक परिस्थिती पाहता सौदी अरेबिया भारतासोबतचे संबंध वेगाने मजबूत करत आहे.
सौदी अरेबियाच्या हवाई दलाच्या तळावर उतरलेल्या भारतीय विमानांमध्ये 5 मिराज 2000 लढाऊ विमान, दोन C-17 वाहतूक विमान आणि एक IL-78 टँकर होते. या विमानांमध्ये 145 हवाई योद्धेही होते. ते सौदी अरेबियातील तळावर रात्रभर थांबले आणि सकाळी निघून गेले. या ऐतिहासिक प्रसंगी भारतीय राजदूत डॉ. सुहेल अजाज खान, डिफेन्स अटॅचे कर्नल जीएस ग्रेवाल यांनी भारतीय हवाई वॉरियर्सची भेट घेतली. ब्रिटनमध्ये होणाऱ्या कोब्रा वॉरियर्स 23 सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची ही टीम २७ फेब्रुवारीला रवाना झाली होती. भेटीदरम्यान भारताचे राजदूत डॉ. खान यांनी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या संबंधांवर प्रकाश टाकला.
सौदी एअरबेसवर भारतीय हवाई दल उतरल्यानंतर पाकिस्तानला भीती वाटते की सौदी अरेबिया आपल्या संरक्षण गरजांसाठी ते सोडून भारताचा हात धरेल. पाकिस्तान सुरुवातीपासून सौदी अरेबियाच्या सैन्याला प्रशिक्षण देत आहे. सध्या पाकिस्तानी लष्कराची एक छोटी तुकडीही सौदी अरेबियात आहे. संरक्षणाच्या बाबतीत पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील अंतर वाढले तर भारतासाठी ही एक चांगली बातमी असेल. या बदल्यात पाकिस्तान सौदी अरेबियाकडून पैसे घेते.