
Eid Ul Adha 2022 Wishes : यावर्षी बकरी ईद 10 जुलै रोजी रविवारी साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात बकरी ईदचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बकरी ईद ला बकर्याचा बळी दिला जातो. या कुर्बानीनेचे तीन भागांमध्ये वाटप केले जाते. विविध प्रकारच्या रेसिपींचा या दिवशी आस्वाद घेतला जातो. गेल्या दोन वर्षापासून या सणावर कोरोनाचे सावट होते. परंतु या वर्षी मात्र या सणाच संपूर्ण देशात उत्साह पसरला आहे. यानिमित्ताने तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता.
“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,
ईद मुबारक”
“ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास
बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!”
“घरीच करू ईद चा सोहळा खास खास
करोनात करा वापर सॅनिटायझर आणि मास्कचा
आरोग्याला द्या महत्व आणि या ईदच्या भरपूर शुभेच्छा”
“धर्म आणि जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची
म्हणूनच गळाभेट घेऊनी देतो शुभेच्छा माझ्या बंधुला या पवित्र ईद ची”
“नेहमी हसत राहा जसे हसतात फूल
दुख सारे विसरा आणि करा धूम
चारी दिशेला पसरवा आनंदाचे गीत
करोनावर मात करून सुरू ठेऊया आपली रीत
याच हर्ष उल्हासाने शुभेच्छा तुम्हाला खूप खूप आणि
नियमांचे पालन करूनी साजरी करूया बकरी ईद.”
निस्वार्थ,क्षमा या मार्गावर वाटचाल करण्याची शिकवण देणारा सण म्हणजे बकरी ईद, अशा या बकरी ईद च्या पवित्र दिवशी आपल्या देशातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिकाधिक वाढीस लागावा हीच प्रार्थना.
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना सुख,
समृद्धि आणि ऐश्वर्य लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
बकरी ईद मुबारक!
ही बकरी ईद तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धि, आनंद आणि ऐश्वर्य घेऊन येवो
हीच आमची सदिच्छा
ईद मुबारक!
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर खुशी,
हर ख्वाईश, हर आरजू, हर तमन्ना , पुरी करे…आमीन!
बकरी ईद मुबारक!
जात, धर्म यापेक्षाही मोठी
असते माणुसकीची शक्ती…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद च्या