
बुलडाणा: राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे दिली.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मख्य कार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, आशिष पवार, विक्रांत जाधव, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.