10th and 12th Result: दहावी-बारावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिली महत्त्वाची माहिती

WhatsApp Group

10th and 12th Result: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

“दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या