मुंबई – राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केले होते. दरम्यान परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केले असताना कॉपीचे प्रकार आढळून येत आहेत. यामुळे आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसेच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिले जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिली आहे.
काल दि. १५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले pic.twitter.com/y2RS7P6P5j
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 16, 2022
अहमदनर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचे प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली आहे.