शिक्षणमंत्र्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास, पत्नीलाही ठोठावला दंड

WhatsApp Group

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांना तीन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने पोनमुडी आणि त्याची पत्नी पी विशालाची यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2016 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने पोनमुडीची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

मात्र, पोनमुडी यांच्याकडे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचा कारभार असल्याने उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. पोनमुडीचे कुटुंब शैक्षणिक संस्था चालवते.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जुलैमध्ये पोनमुडी आणि त्याचा मुलगा गोथम सिग्मानी यांची चौकशी केली होती. बेकायदेशीर वाळू उत्खननाशी संबंधित असलेल्या 2011 च्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली होती. 2006 ते 2011 दरम्यान खाण आणि खनिज मंत्री असताना पोनमुडी यांनी तामिळनाडू गौण खनिज सवलती कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ईडीने केला होता.