
जालना – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यामध्ये असलेली सर्व यंत्रसामग्री जप्त केली आहे.
शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका मानला आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात एकीकडे राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडी कडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.