नवी दिल्ली – पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यानंतर आता केंद्र सरकारने खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल आणि तेलबियांची साठवणूक करण्याचा आदेश राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
पुरवठा साखळी आणि व्यापार यांना कोणतीही बाधा न आणता आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. बुधवारी याबद्दलची अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
IPL २०२२ मध्ये हार्दिक पांड्याचा अहमदाबाद संघ ‘या’ नावाने मैदानात उतरणार
खाद्य तेल आणि तेलबिया यांच्या साठवणुकीची मर्यादा तीन महिन्यांनी वाढवली असून आदेशामध्ये साठवणुकीच्या मर्यादेचाही उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने मंगळवारी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी याबाबत बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी साठवणूक मर्यादेचा आदेश लागू करावा असं केंद्राने सांगितले आहे.
लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय