ED Summons to Anil Parab : अनिल परब यांना ईडीचे समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

WhatsApp Group

मुंबई – महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब (ED Summons to Anil Parab) यांना ईडीने समन्स बजावले आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी हे समन्स पाठवले आहे. अनिल परब यांच्या अडचीणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परब यांना उद्या ईडीसमोर त्यांचे विधान नोंदवण्यास सांगितले जात आहे.

काही दिवसापूर्वी परिहवन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. या धाडीत त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. आता ईडीने पुन्हा समन्स बजावले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय अनिल परब गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे आता ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनिल परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.