मुंबई – औरंगाबादमध्ये गुरुवारी ईडीने (Enforcement Directorate) अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमध्ये मुंबई शहराचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्या कार्यालयावरही ED ने छापा टाकला आहे असे वृत्त TV9 मराठीने दिले आहे. मात्र, अजूनही कोणत्याही अधिकृत सूत्रांकडून या बातमीची खात्री पटू शकलेली नाहीये.
औरंगाबादध्ये ED चे छापेः विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई, मलिक-वानखेडे लढाईचे पडसाद?https://t.co/B8aCYpw7gF#Aurangabad| #ED| #Raid| #NawabMalik|
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2021
सक्तवसुली संचलनालयाच्या (ED ) या कारवाईमुळे पूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ईडीने औरंगाबादमध्ये गुरुवारी ७ ठीकाणी छापा टाकला, अशी माहिती समोर येत आहे. ईडीच्या या धडक कारवाईमुळे औरंगाबादमधील बड्या उद्योगपतींचे धाबे मात्र दणाणले आहेत.