मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर ईडीची धाड

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या राहुल कनाल Rahul Kanal यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे.

विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईमधील वांद्रे येथील अल्मेडा इमारतीमध्ये राहुल कनाल यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीबाहेर सकाळपासून केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात झाले असून ईडीकडून कनाल यांच्या घरावर धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल कनाल यांच्याबाबत निलेश राणे यांनीही काही गंभीर आरोप केले आहेत. राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडसत्र सुरू असतानाचं निलेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. “आदित्य ठाकरेचा पुरवठा मंत्री राहुल कनाल याच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली आहे. राहुल कनाल या व्यक्ती बांद्रा या भागात कोणलाही विचारले तरी कळेल याचे खरे धंदे काय आहे ते. नाईटलाइफ गँग मधला हा प्रमुखआहे, स्वत: हुक्का पार्लर चावलतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करत असतो”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.