Breaking News: शिवसेनेच्या दिग्गज नेत्याच्या घरी ईडीची धाड!

WhatsApp Group

जालना – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीने छापा टाकला आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ईडीच्या या धाडीनंतर किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत या कारवाईची माहिती दिली असून ED ने केलेल्या या कार्यवाहीचे आम्ही स्वागत करीत आहोत असं म्हटलं आहे.

औरंगाबाद येथील एका उद्योगपतीने 43 कोटींचा साखर कारखाना 27 कोटी 58 लाखांना अर्जुन खोतकर यांना विकला होता. या व्यवहारामध्ये आर्थिक गडबडीची तक्रार आल्यामुळे हा छापा टाकण्यात आला असं म्हटलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आज ईडीने कारवाईला सुरवात केली आहे. किरीट सोमय्या यांनी लवकरात लवकर कारवाई सुरू करण्याचा दावा केला होता, तो दावा आता खरा होताना दिसत आहे. या कारवाईमुळे महाविकास आघाडीचा अजून एक नेता अडचणीत आला आहे.

अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने अनेक कागदपत्रांची तपासणी केली आहे मात्र ईडीने नक्की कोणती कागदपत्रे तपासली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. अर्जुन खोतकर हे 2007 पासून जालना बाजार समितीचे सभापति आहे. ईडीने या बाजार समितीच्या कार्यालयावरही छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. येत्या जानेवारीमध्ये या बाजार समितीच्या निवडणुका होणार होत्या मात्र, त्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. आता या धाडीमुळे बाजार समितीच्या निवडणूकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.