कोलकात्याच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा, पलंगाखाली सापडले 7 कोटी रुपये

WhatsApp Group

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. येथे पलंगाखाली 500 आणि 2000 च्या नोटांच्या पिशव्या सापडल्या आहेत. मोबाईल गेमिंग फ्रॉड प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळी ईडीच्या पथकाने गार्डनरिक येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक निसार खान यांच्या घरावर छापा टाकला.

निसार खान यांच्या घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 500 आणि 2000 रुपयांचे अनेक बंडल कॉटखाली प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये गुंडाळलेले आढळून आले आहेत. हे पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना कॅश मोजण्याची मशीन मागवावी लागली.