राहुल – सोनिया गांधींना ईडीची नोटीस; ८ जून रोजी होणार चौकशी

WhatsApp Group

नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. १९४२ मध्ये जेव्हा नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं, त्यावेळी इंग्रजांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आज मोदी सरकारदेखील तेच करत आहे. त्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे, असं सूरजेवाला म्हणाले आहेत.