राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

WhatsApp Group

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर जप्त केले आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीने यापूर्वी दोनदा चौकशी केली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

ईडीला त्याच्या मालमत्तेच्या नोंदी, मालमत्तेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आली. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीजी हाऊसमध्ये असलेल्या एका घरात ही कारवाई करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.