मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

WhatsApp Group

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर NSE कर्मचाऱ्यांचे कॉल बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पांडे 30 जून रोजी निवृत्त झाले. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिले होते.

RBI : मोठी बातमी! तुमचेही या बँकेत खाते असेल तर आता १५ हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु होती. या प्रकरणात चौकशीसाठी ते ईडी कार्यालायत मंगळवारी (19 जुलै) दाखल झाले होते. या वेळी ईडीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे संजय पांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आजच (19 जुलै) घेतली होती. त्यानंतर काही तासातच ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.