हिरो मोटोकॉर्पच्या सीएमडीवर ईडीची कारवाई, 25 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त

0
WhatsApp Group

अंमलबजावणी संचालनालयाने () दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पचे सीएमडी आणि अध्यक्ष पवन कुमार मुंजाल यांच्यावर कारवाई केली आहे. ईडीने त्याच्या दिल्लीतील 3 मालमत्ता जप्त केल्या आहेत, या मालमत्तेची बाजारातील किंमत अंदाजे 25 कोटी रुपये आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने सांगितले की, दिल्लीतील तीन वेगवेगळ्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याआधीही हिरो मोटोकॉर्पची मालमत्ता सील करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पवन मुंजालची 50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.