बिर्याणी खाल्ल्याने पुरुषांची लैंगिक शक्ती कमी होते..; राजकीय नेत्याने दोन दुकानं केली बंद

WhatsApp Group

तुम्हाला बिर्याणी खायला आवडते का? जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये रहात असाल तर तुम्हाला काही दुकानात बिर्याणी खायला मिळणार नाही. खरं तर, टीएमसी नेत्याने बिर्याणी खाल्ल्याने पुरुषांच्या मर्दानी शक्तीवर परिणाम होत असल्याचा आरोप करत 2 बिर्याणीची दुकाने बंद केली आहेत. कूचबिहार नगरपालिकेचे अध्यक्ष आणि तृणमूल नेते रवींद्रनाथ घोष यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक लोकांनी काही तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर जेव्हा टीएमसी नेते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना या दुकानांकडे परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी ही दुकाने बंद करून घेतली.

रवींद्रनाथ घोष काय म्हणाले?

रवींद्रनाथ घोष म्हणाले की, या दुकानांमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे पुरुषांची पौरुषता कमकुवत होत असल्याची तक्रार काही काळापासून होत होती. बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोक काही दिवसांपासून येथे येऊन बिर्याणी विकत आहेत.अशा परिस्थितीत आम्ही येथे छापा टाकला असता या दुकानांना व्यापार परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर दुकानमालकांनी याबाबत कोणतेही निवेदन दिलेले नाही.