
नाशिकमध्ये आज (23 नोव्हेंबर) पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली आहे. आज पहाटे चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र नाशिकपासून 89 किमी पश्चिमेस सांगितले जात आहे, जे जमिनीपासून 5 किमी खोल होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ज्या वेळी भूकंप झाला, त्या वेळी बहुतांश लोक आपापल्या घरात झोपले होते. झोपेत असल्याने लोकांना त्याची फारशी जाणीव झाली नाही. काही भागात लोकांना भूकंपाचे धक्के नक्कीच जाणवले. गेल्या काही वर्षांत भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच इंडोनेशियामध्ये झालेल्या भूकंपामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
याआधी मंगळवारी कारगिल, लडाखमध्येही 4.3रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी 10.5 मिनिटांनी भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली की, भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलपासून 191 किमी उत्तरेस होता. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
An earthquake of magnitude 3.6 occurred 89km West of Nashik, Maharashtra at around 04:04am today. The depth of the earthquake was 5 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/ULIdOrtiRN
— ANI (@ANI) November 22, 2022
दुसरीकडे, 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्येही भूकंपाचे हे धक्के जाणवले. सायंकाळी 7.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये 10 किमी खोलीवर होता. याच्या तीन दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते.
भूकंपाचे कारण?
भूकंपाचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एखाद्या ठिकाणी एकमेकांवर आदळतात तेव्हा तेथे एक फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे दुमडतात. पृष्ठभागाच्या कोपऱ्याला वाकल्यामुळे, त्या ठिकाणी दबाव निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे पृथ्वी हादरते, ज्याला सामान्य भाषेत भूकंप म्हणतात.
Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update