Earthquake: कोल्हापूरपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के, जाणून घ्या किती होती तीव्रता

WhatsApp Group

Earthquake: महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत (Jammu Kashmir) देशात भूकंपाचे (Earthquake)धक्के जाणवले आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानातील (Afghanistan) काबूलमध्ये पृथ्वी हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. कटरापासून 62 किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

कोल्हापूरपासून पूर्वेला 171 किमी अंतरावर रात्री 2:21 वाजता 3.9 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या 10 किलोमीटर खालीपर्यंत होता. काश्मीरमध्ये पहाटे 3:28 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, जिथे भूकंपाची खोली जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होती. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये दुपारी 2:55 वाजता 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. येथे भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या खाली 80 किमी खोलीवर होता.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत 10 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी रात्रीही जम्मू-काश्मीरमध्ये तासाभरामध्ये दोनदा पृथ्वी हादरली. बुधवारी रात्री 11:04 वाजता खोऱ्यात पहिला भूकंप झाला, त्याची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. दुसरा भूकंप रात्री 11:52 वाजता 4.1 रिश्टर स्केलचा होता.