भूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान हादरलं, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बादघिस या प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीत 26  लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या भूकंपामुळे विविध ठिकाणी अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी दोन च्या सुमारास हा भूकंप झाला.


बाघिसचे गव्हर्नर मोहम्मद सालेह यांनी सांगितले की, कादीस जिल्ह्यात घराचे छत कोसळल्याने अनेक लोकांचा चिरडून मृत्यू झाला. याशिवाय इतरही अनेक लोक जखमी झाले असून त्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानच्या उत्तर भागात शुक्रवारी असेच धक्के जाणवले होते.


पेशावर, मानशेरा, बालाकोट आणि चारसदासह खैबर-पख्तूनख्वामधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, सुदैवाने भूकंपामुळे या भागांत कोणतीही हानी झाली नाही.